loading

आता चौकशी करा.

मी मान्य करतो की “Submit” वर क्लिक केल्यानंतर, टाटा मोटर्स किंवा त्यांचे सहयोगी यांच्याकडून माझ्या मोबाईलवर एक कॉल येणे अपेक्षित आहे जे टाटा वाहनांच्या खरेदीत मला सहाय्य करतील.

कृपया तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP टाका

प्राप्त झाले नाही? पुन्हा OTP पाठवा
Check
धन्यवाद TATA ACE এ আপনার আগ্রহের জন্য। আমাদের দল শীঘ্রই আপনার সাথে সংযোগ করবে


आकांक्षा - यशाच्या 200,000 महत्त्वाच्या कथा

टाटा एस गोल्ड बीएस 6 - आपल्या स्वतःच्या वाहतूक व्यवसायासह यश मिळवा.
तुमच्या व्यवसायाचा रस्ता टाटा एस गोल्ड बीएस 6 पासून सुरू होतो, जे तुम्हाला आर्थिक फरक दूर करण्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी यश, स्वाभिमान आणि आनंद मिळवण्यासाठी मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
Ramdas More

रामदास मोरे

पुणे

टाटा एसने माझे आयुष्य बदलले. केवळ मी आनंदी नाही तर, चालक देखील टाटा एस मिनी ट्रकमुळे आनंदी आहेत

व्हिडिओ पहा
ए सत्य नारायण

ए सत्य नारायण

चेन्नई, तमिळनाडु

दोनाची चार वाहने झाली. आता माझ्याकडे एकूण 7 वाहने आहेत, यात तीन टाटा 207 आहेत. वाहनांची संख्या वाढल्याने माझा नफाही वाढला. मी स्वतःचे घर देखील बांधू शकलो. मी टाटा एस मिनी ट्रक खरेदी करण्यापूर्वी माझ्या जीवनात काहीही नव्हते

पुढे वाचा व्हिडिओ पहा
मझहर आलम खान

मझहर आलम खान

मुंबई

मला टाटा एस मिनी ट्रक मिळाला तेव्हा माझे भाग्यच बदलले. मी खरोखर चांगले काम करु लागलो आणि समाजात आदराचे स्थान मिळाले. माझ्या सर्व मुलांना मी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पाठवणे मला परवडू लागले.

पुढे वाचा व्हिडिओ पहा
दिलिप जैन

दिलिप जैन

धुळे, महाराष्ट्र

आमचा मीठाचा एक लहान व्यवसाय आहे. आम्ही 2007 मध्ये एक टाटा एस मिनी ट्रक खरेदी केला. लवकरच, ही संख्या 1 वरुन 7 झाली. मी 3 घरे बांधली आणि माझ्या बहिणींच्या आणि माझ्या मुलीच्या लग्नाचा खर्चही केला.

पुढे वाचा व्हिडिओ पहा
केसी चंद्रशेखर

केसी चंद्रशेखर

बेंगलुरु, कर्नाटक

माझ्या भावाच्या वाहतुक व्यवसायातून प्रेरणा घेऊन, मी एक टाटा एस मिनी ट्रक खरेदी केला. नवीन एसद्वारे, उत्पादनाच्या डिलिवरीज वेळेत होऊ लागल्या, माझ्या चालकांना ही गाडी आवडली, आणि माझा व्यवसाय वाढला. माझ्याकडे आता 45 चालक कामाला आहेत.

पुढे वाचा व्हिडिओ पहा
मोहम्मद महमूद

मोहम्मद महमूद

हैदराबाद, तेलंगण

मी टाटा एस मिनी ट्रक खरेदी केल्यानंतर माझा मीठाचा व्यवसाय सुधारला. मी माझ्या मुलाच्या विवाहाचा खर्चही करु शकलो इतकंच नव्हे तर माझ्या घराचे पुन्हा बांधकाम केले आणि माझ्या एसद्वारे भारताच्या प्रत्येक भागाला मी भेट देऊ शकलो.

पुढे वाचा व्हिडिओ पहा
इश्वरभाई रामचंद्रभाई रावळ

इश्वरभाई रामचंद्रभाई रावळ

पाटण, गुजरात

मी एक कामगार म्हणून काम करत होतो, दिवसाला कसेबसे रु.100 मिळायचे. 2006 मध्ये मी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचं ठरवलं तेव्हा, मी मित्राच्या सूचनेवरुन एक टाटा एस मिनी ट्रक खरेदी केला. मी शेतातून स्थानिक बाजारपेठेत भाज्या घेऊन जायचो.

पुढे वाचा व्हिडिओ पहा
Jayanti bhai Patel

जयंतीभाई पटेल

गुजरात

2001 च्या भूकंपात, माझ्या व्यवसायाला मोठा फटका बसला. टाटा एस मिनी ट्रकमध्ये गुंतवणूक करण्याच्या माझ्या निर्णयामुळेच माझे आयुष्य पुन्हा रुळावर आणण्यात मला मदत झाली.

व्हिडिओ पहा
Rajkumar

राजकुमार

चंडीगढ

माझे वडिल शेतकरी होते. आमची आर्थिक स्थिती वाईट असल्याने मी जास्त शिकू शकलो नाही. पण मला माहिती होतं की 9 ते 5 ही नोकरी मला जमायची नाही. एके दिवशी, एका मित्राने मला टाटा एस खरेदी करण्याचा सल्ला दिला.

पुढे वाचा व्हिडिओ पहा
लक्ष्मीधर दास

लक्ष्मीधर दास

भुवनेश्वर, ओडिशा

माझ्या मुलीचा जन्म झाल्यानंतर मी कालाहंडीवरुन ओडिशाला आलो. भुवनेश्वरमध्ये मला काहीही काम नव्हतं. माझ्याकडे पैसे नव्हते. अखेर मी एक टाटा एस भाड्याने घेतला. माझा व्यवसाय वाढला.

पुढे वाचा व्हिडिओ पहा
Krishna Koli

कृष्णा कोळी

मुंबई, महाराष्ट्र

मी एक डिलिवरी बॉय म्हणून महिन्याला 800 रुपये कमवत होतो. या पगारावर जिवंत राहणं शक्य नव्हतं. माझी स्वप्नं आणि माझं वास्तव यांच्यापैकी मला निवड करायची होती.

पुढे वाचा व्हिडिओ पहा
Honey Bindal

हनी बिंदाल

रायपुर, छत्तीसगढ

मी UPSC साठी परीक्षांचा अभ्यास केला पण उत्तीर्ण होऊ शकलो नाही. माझी नोकरी सोडणं अवघड होतं कारण तुम्ही एखादा व्यवसाय सुरु करता, तेव्हा तुम्हाला निश्चित पगार मिळत नाही. पण मला स्वतःचं काहीतरी सुरु करायचं होतं आणि स्वतःची ओळख निर्माण करायची होती.

पुढे वाचा व्हिडिओ पहा
बलि ठाकुर

बलि ठाकुर

रायपुर, छत्तीसगढ

मी इयत्ता 10 वीत असताना माझ्या वडिलांची नोकरी गेली. कुटुंबाला मदत करण्यासाठी मी कामाला सुरुवात केली. मी वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात बघितल्यानंतर एक टाटा एस खरेदी केला.

पुढे वाचा व्हिडिओ पहा
विवेक शर्मा

विवेक शर्मा

इंदूर, मध्य प्रदेश

मी रिटेल आणि फायनान्समध्ये एमबीए केले आहे. मी एका FMCG कंपनीमध्ये इंटर्न देखील होतो जिथे मला व्यवसायाच्या अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. माझे एमबीए पूर्ण केल्यानंतर, मी एका बँकेत काम केले पण माझ्या 9 ते 5 नोकरीचा मला लवकरच कंटाळा आला

पुढे वाचा व्हिडिओ पहा
संगम तुलसी लक्ष्मण राव

संगम तुलसी लक्ष्मण राव

विजयवाडा, आंध्र प्रदेश

माझा पहिला टाटा एस मिनी ट्रक चालवायला लागल्यापासून 4 दिवसातच, मला समजलं की हा चांगला आहे. देखभाल अतिशय कमी आणि लोड वाहून नेण्याची क्षमता उत्तम आहे, त्यामुळे माझा व्यवसाय वाढवण्यात मला मदत झाली.

पुढे वाचा व्हिडिओ पहा
उस्मान शेख

उस्मान शेख

लातुर, महाराष्ट्र

माझे स्वतःच चपलांचे दुकान होते ज्यामुळे माझे कसेबसे भागायचे. टाटा मोटर्समधून एकजण मला एकदा भेटला आणि हप्त्यांवर एक टाटा एस मिनी ट्रक खरेदी करण्यात मला मदत केली. माझ्या एका मुलाने ही गाडी चालवायला सुरुवात केली.

पुढे वाचा व्हिडिओ पहा
Ramdas More

शशिकांत मोरे

पुणे, महाराष्ट्र

टाटा एस मिनी ट्रक माझी लक्ष्मी आहे आणि माझी पत्नी वारल्यानंतर माझे आयुष्य पूर्ववत करण्यात मला याची मदत झाली. याच्या आधारे, मी माझ्या मुलांची काळजी घेऊन त्यांचे शिक्षण करु शकलो.

पुढे वाचा व्हिडिओ पहा
मोहम्मद फाकरु मियां

मोहम्मद फाकरु मियां

हैदराबाद, तेलंगण

कठोर मेहनतीवर माझा विश्वास आहे आणि गेली 25 वर्षे गाडी चालवतो. मी माझा पहिला टाटा एस मिनी ट्रक 2006 मध्ये खरेदी करण्यापूर्वी कठीण काळ सोसला. मी पहिल्या दिवशी एस कामावर नेला तेव्हा, सुमारे 15 लोकांनी तो पाहून प्रशंसा केली.

पुढे वाचा व्हिडिओ पहा
माधव रेड्डी

माधव रेड्डी

हैदराबाद, तेलंगण

मी हैदराबादच्या बाजारांमधून गावांकडे भाज्यांची वाहतूक करायचो. मला घर नव्हते आणि माझे उत्पन्न खूपच कमी होते. मी 2003 मध्ये एक थ्री-व्हीलर चालवायला सुरुवात केली. पण भाजी विक्रेत्यांना त्यात भाज्या चढवायला समस्या येत होती.

पुढे वाचा व्हिडिओ पहा
लक्ष्मणन आदिकेशवन

लक्ष्मणन आदिकेशवन

चेन्नई, तमिळनाडु

2004 मध्ये, माझी 10 वी पूर्ण केल्यावर, मी चेन्नईला आलो, तेव्हा माझ्याकडे फक्त रु.150 होते. मी काही दुकानांमध्ये काम केलं नंतर स्वतःचं किराणा दुकान आणि पाणी बाट्ल्यांचा व्यवसाय सुरु केला. लवकरच, मी मिनरल वॉटर डिलिवरी व्यवसाय सुरु केला.

पुढे वाचा व्हिडिओ पहा
कोटेश्वर राव

कोटेश्वर राव

विजयवाडा, आंध्र प्रदेश

मी हातगाडी आणि रिक्शा ओढण्याचं काम काही लोकांसोबत करायचो. नंतर 2012 मध्ये, आम्ही बाजारात टाटा एस मिनी ट्रक पाहिला आणि तो खरेदी केला. अचानक आम्ही आंध्रमध्ये एकाच फेरीत 150-200 किमीपर्यंत प्रवास करु लागलो.

पुढे वाचा व्हिडिओ पहा
देव रेड्डी श्रीराम रेड्डी

देव रेड्डी श्रीराम रेड्डी

विजयवाडा, आंध्र प्रदेश

आमचे नवा देव रेड्डी आणि श्रीराम रेड्डी आहे. लोड ट्रान्सपोर्टर म्हणून नोकरी करुन थकल्यावर, आम्ही 9 बेरोजगोर वाहतुकदार एकत्र झालो आणि एकत्रित मिळून 3 थ्री व्हीलर्स खरेदी केल्या. पण, हा व्यवसाय चांगला चालला नाही.

पुढे वाचा व्हिडिओ पहा
प्रवीण ब्राह्मनकर

प्रवीण ब्राह्मनकर

धुळे, महाराष्ट्र

आम्ही एका थ्री व्हीलरमधून पाण्याचे पाऊचेस आणि पाण्याच्या बाटल्या डिलिवरीच्या व्यवसायात होतो. पण, शहराच्या प्रत्येक भागात पोहोचणं आम्हाला अवघड जायचं. एके दिवशी, आम्हाला छोटा हाथी एस मिनी ट्रकची माहिती मिळाली.

पुढे वाचा व्हिडिओ पहा
अभिनप्पा गौडा

अभिनप्पा गौडा

कोलार, कर्नाटक

टाटा एस मिनी ट्रकचा आरंभ झाल्यानंतर एक वर्षाने मी एक बुक केला. एका ग्राहकाने अनेक व्यापाऱ्यांना माझे नाव सांगून माझा व्यवसाय सुधारण्यात मला मदत केली.

पुढे वाचा व्हिडिओ पहा